स्थायी उपक्रम

-- हॉस्पिटल --

संस्थानाच्या वैद्यकीय उपक्रमांतर्गत श्रीक्षेत्र नाणीजधाम या मुख्य पीठामध्ये दवाखाना उघडण्यात आलेला आहे. जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे ब्रह्मलीन सद्गुरु -समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज हॉस्पिटल या नावाने सदरची सेवा कार्यरत आहे. ही सेवा पूर्णत: विनामूल्य आहे. ही सेवा मोठ्या प्रमाणात उभारण्याचा संस्थानाचा मानस आहे. याकरीता सध्या कार्यरत असलेली सेवा पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरु आहे. महिन्याला सरासरी पाच हजार रुग्ण या सेवेचा पूर्णत: विनामूल्य लाभ घेत आहेत.

-- शाळा --

संस्थानाच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज प्रायमरी स्कूल, ( इंग्लीश मिडीयम) या नावाची पूर्णत: इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु आहे. अत्यंत दुर्गम व अविकसीत भागामध्ये ही शाळा सुरु आहे. शहरातील शाळांमध्ये असणार्या सोईसुविधा आणि शिक्षणाचा दर्जा या ग्रामीण भागामध्ये संस्थानाने उपलब्ध करुन दिला आहे. समाजातील अत्यंत गोरगरीबांची मुले ज्युनिअर के.जी. पासून ग्रॅज्युएशनपर्यंत या शाळेमधून विनामूल्य शिक्षण घेणार आहेत. सध्या नैसर्गिक वाढीप्रमाणे ज्युनिअर के.जी. ते पाचवी पर्यंतचे सात वर्ग सुरु आहेत. या शाळेमध्ये सर्व जाती-धर्मांच्या मुलामुलींना मोफत शिक्षण दिले जाते. सध्या १९० विद्यार्थी विद्यार्थीनी या शाळेत शिक्षण घेत आहेत. दरवर्षी एक-एक वर्ग नैसर्गिक वाढ या नियमाने वाढत आहे.

-- वेदपाठशाळा --

भारतीय संस्कृतीचे आणि वैदिक संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने ज.न.म.संस्थानाने ही वेदपाठशाळा सुरु केली आहे. कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, नागपूर या विश्वविद्यालयामार्फत श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे सन २०१० पासून आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य वेदपाठशाळा या नावाने ती कार्यरत आहे. समाजातील सर्व ज्ञातींना वैदिक शिक्षण मिळावे, याकरता ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर जातीतील मुलांना १० वी नंतर दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्स येथे दिला जातो. वेद आणि पौराहित्य या विषयाचे सांगोपांग ज्ञान या वेदपाठशाळेत दिले जाते. आत्तापर्यंत दोन बॅचेस या पाठशाळेतून शिकून बाहेर पडल्या आहेत. सदरचे विद्यार्थी अतिशय उत्तम रितीने समाजामध्ये पौराहित्य करत आहेत. या वेदपाठशाळेत ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना जेवणखाण, निवास, कपडा-लत्ता, औषधपाणी, शालेय पाठ्यपुस्तके तसेच युनिव्हर्सिटीची फी या सर्व गोष्टी संस्थानातर्फे विनामूल्य दिल्या जातात.

-- अन्नछत्रालय --

ज.न.म. संस्थानाचे मुख्य पीठ नाणीजधाम, उपपीठ- गोवा, मराठवाडा, मुंबई येथे आश्रम आहेत. या आश्रमांना दररोज हजारोंच्या संख्येने लोक भेट देत असतात. या लोकांची भोजनाची दोन्ही वेळची विनामूल्य सेवा संस्थानातर्फे केली जाते. समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज प्रसादालय या नावानी सर्व पिठांवर मोफत अन्नछत्रालय सुरु आहे. अन्नछत्रालयाची प्रशस्त इमारत, अत्यंत शुद्ध सात्विक आहार, स्वच्छता, टापटीपपणा, दोन्ही वेळचे पोटभर जेवण यामुळे त्या-त्या एरीयात या सेवेचे कौतुक होत असते.

-- यात्रीनिवास --

ज.न.म. संस्थानाच्या वेगवेगळ्या पीठांमध्ये येणार्या यात्रेकरुंना निवासाची सोय संस्थानाने करुन दिलेली आहे. अनेक धर्मशाळा असून त्यामध्ये निवासाची सोय विनामूल्य आहे. तर १५० खोल्यांचे यात्रीनिवास आहे. यामध्ये संडास, बाथरुमची सोय ऍटॅच आहे. येणार्या यात्रेकरुंच्या सोईंसाठी आणखीन काही खोल्यांचे काम संस्थानाने हाती घेतलेले आहे. या श्रीक्षेत्री येणार्या यात्रेकरुंना मोठ्या प्रमाणात सार्वजनिक संडास बाथरुमची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे. ज.न.म. संस्थानाच्या सर्व पीठांमध्ये येणार्या व्यक्तींना मन:शांती मिळावी, अध्यात्मिक उपासना घडावी, धार्मिक व सांस्कृतिक ज्ञान मिळावे याकरता सर्व सोइसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आणि या सर्व सोईसुविधा विनामूल्य आहेत.

-- स्थायी उपक्रम ताजा घडामोडी --

हॉस्पिटल
हॉस्पिटल
हॉस्पिटल
हॉस्पिटल
हॉस्पिटल