सर्व प्राणीमात्रांच्या स्थैर्य, उन्नती, प्रगती व शांती करिता सतत सेवाकार्यात कार्यशील राहणे. ही सेवा एका विशिष्ट जातीधर्मासाठी नसून अखंड मानवतेसाठी आहे. भारतातील दुर्गमातील दुर्गम खेड्यापाड्यांपासून अगदी शहरी भागातील गरीब, गरजू, दीनदुबळया लोकांची तसेच प्राण्यांची विनाशुल्क वेगवेगळ्या प्रकारची सेवा अविरतपणे सुरु ठेवणे.
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान उपक्रम
ज.न.म. संस्थानाच्या वैद्यकीय उपक्रमांतर्गत हायवे वरील अपघातग्रस्तांच्या मदतीकरिता १० रुग्णवाहिकांचे लोकार्पण.. एकूण ५२ रुग्णवाहिका कार्यरत
शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी जगद्गुरुश्रींच्या जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे १० रूग्णवाहिकांचे लोकार्पण करताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेब, शेजारी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज व प. पू. कानिफनाथ महाराज आदी
श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे शनिवारी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अभिष्टचिंतन करताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब
श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे शनिवारी रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमात बोलताना जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज. शेजारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेब
श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे शनिवारी रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब
श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे शनिवारी रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमात बोलताना उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेब
ज.न.म. संस्थानाच्या वैद्यकीय उपक्रमांतर्गत हायवे वरील अपघातग्रस्तांच्या मदतीकरिता एकूण ५२ रुग्णवाहिका कार्यरत
श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे श्रीराम नवमी वारी उत्सवाच्या वेळी उद्दोग मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री रत्नागिरी व रायगड मा. ना. श्री. उदयजी सामंत यांचा जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पवित्र हस्ते व लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी केंद्रीय रस्ते, वाहतूक व परिवहन मंत्री मा. नितीनजी गडकरी, पीठाचे उत्तराधिकारी प. पु. कानिफनाथ महाराज उपस्थित होते.
गुरुवार दिनांक ३० मार्च रोजी श्रीक्षेत्रं नाणीजधाम येथे आयोजित श्रीराम नवमी उत्सव दिनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिटयूट कॉलेजच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेब ( केंद्रीय रस्ते, वाहतूक व परिवहन मंत्री) व उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेव याचे हस्ते व जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज व प. पू. कानिफनाथ महाराज यांच्या पवित्र उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
शिष्याने ही गोष्ट विशेषतः लक्षात ठेवावयास हवी की, आपल्या प्रत्येक गुरुबंधूबरोबर सलोख्याचे संबंध ठेवावयास हवेत. आपापसात ईर्षा वा द्ववेष ठेवण्याने शक्ती क्षीण होते. तसेच चित्तवृत्ती त्याच गोष्टीत रस घेऊ लागते. साधनेत बसल्यानंतरही वारंवार तेच विचार समोर येत असतात. यासाठी दुसऱ्यांच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करणे अत्यावश्यक आहे. व्यवहारातही सहनशीलता ठेवावी. मनाला इतरत्र भटकू न देता त्याला गुरुमंत्राच्या जपात अडकून ठेवावे