JNMS,JNMS | Nanijdham - Free Food Service
-- अन्नदान सेवा --
श्रीक्षेत्र नाणीजधाम या आश्रमी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक भक्तगण ‘श्रीं’ च्या दर्शनासाठी येत असतात. समाजाच्या सर्व थरातील भाविकांची सेवा करण्याच्या उद्देशाने जगदगुरूं रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांनी सन २००१ पासून अन्नदान सुरु केले. या श्रीक्षेत्री दुपारी १२.०० ते २.३० आणि सायं. ७.३० ते ९.३० पर्यंत मोफत अन्नदान सुरु असते. वर्षातून या श्रीक्षेत्री पाच उत्सव संपन्न होतात. त्यावेळी चौवीस तास अखंडीत अन्नदान सुरु असते. उत्सवाच्या आदल्या दिवसापासून उत्सवाच्या सांगतेपर्यत सुमारे ४८ ते ५० तास प्रत्येक उत्सवात अन्नदान सुरु असते. प्रत्येक उत्सवाप्रसंगी सुमारे अडीच ते तीन लाख भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. दररोज भात, भाजी, वरण, पोळी असा पुर्ण अन्नाचा महाप्रसाद असतो.
संताघरी दान करावे. त्याचे पुण्य फारच अलौकीक असते. ज्या भाविकांना आपला पुण्यसंचय वाढावा असे वाटते त्यांना या सेवेत सहभागी होता येते. याकरीता एक दिवशीय अन्नदान करावयाचे झाल्यास रक्कम रुपये १०,०००/- भरावे लागतात. तसेच ज्यांना आजीवन अन्नदान करावयाचे आहे, त्यांना ६३,०००/- रुपये भरावे लागतात. ज्यादिवशी आपण अन्नदान निधी भरतो त्या दिवशी आपल्याला अन्नदान केव्हा होणार याची तारीख दिली जाते. काही अन्नदात्यांना ठरावीक तारखेलाच अन्नदान करण्याची इच्छा असते. अशा अन्नदात्यांचा त्या दिवशी संकल्प विधी करून घेतला जातो व प्रत्यक्षात अन्नदान सिरीयल नंबरप्रमाणे येणार्या तारखेला होतो. अन्नदानाच्या दिवशी स्वत: अन्नदात्यांना श्रीक्षेत्री उपस्थित रहावे लागते. त्यांची रहाण्याची, भोजनाची व सर्व धार्मिक विधीची संपूर्ण व्यवस्था संस्थान स्वखर्चाने करते.
अन्नदानाच्या दिवशी अन्नदाते उभयता असतील तर पुरुषाने सोवळे आणावे आणि महिलेने नऊवारी साडी या पोशाखात विधीला बसावे लागते. सर्वात प्रथम ‘श्रीं’ ची प्रात:कालची महापुजा झाल्यावर नाणीज पीठाच्या पुरोहितांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अन्नदात्यांचा अन्नदान हा धार्मीक विधी सुरु होतो. या विधीमध्ये प्रामुख्याने गणपतीपूजन, संकल्प, कलश, शंख, घंटा, दीप यांचे विधीवत पूजन केले जाते. तदनंतर वरुण देवतेचे पूजन केले जाते. यजमानांच्या कुलदेवतेचे पूजन, उपास्यदेवतेचे पूजन, पिठ देवता पूजन, जगदगुरूं नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुकांचे पूजन केले जाते. २७ मातृकापूजन, ६४ योगिनी पूजन, नांदीश्राध्द, पुण्याहवाचन, नवग्रहपुजन, होमहवन, पुर्णाहुती,प्रोक्षण विधी,प्रत्यक्ष जगदगुरूं ंचे आशिर्वाद. तदनंतर स्वत: अन्नदाते (यजमान) गजानन महाराजांना मध्यान्हपुजेच्या वेळी नैवेद्य दाखवितात. गजानन महाराज व पीठदेवता यांचे आशिर्वाद घेऊन यजमान प्रसादालयामध्ये भोजन वाढण्यासाठी येतात. त्यावेळी यजमानाने सपत्नीक उपस्थित भाविकांपैकी किमान ५ लोकांना तरी स्वत:च्या हाताने महाप्रसाद वाढावयाचा असतो. यजमान अन्नदात्यांना उपस्थित असणार्या सर्व भविकांना महाप्रसाद वाढावयाचा असल्यास वाढता येतो. तदनंतर यजमान अन्नदात्यांनी महाप्रसाद घ्यावा.
आपल्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा आपल्याला एखाद्या विशिष्ठ गोष्ठीसाठी अन्नदान करावयाचे झाल्यास करु शकता. रक्कम रु. ६३००० /- भरणार्या व्यक्तीला आजीवन अन्नदाते असे संबोधले जाते. त्यांचा संकल्प तहहयात अन्नदान असा केला जातो. दररोज एका व्यक्तीला त्यांनी दिलेल्या रक्कमेच्या व्याजातून अन्नदान केले जाते. आपण अन्नदान करु इच्छित असाल तर खालील पत्त्यावर संपर्क करावे.
जगदगुरूं नरेंद्राचार्य महाराज संस्थान
श्रीक्षेत्र नाणीजधाम, रत्नागिरी (महाराष्ठ्र), पिन - ४१५८०३
संपर्क नं. -०२३५२- २५००११
मनीऑर्डर, चेक, डिमांड ड्राफ्टने अन्नदान रक्कम भरावयाची असल्यास जगदगुरूं नरेंद्राचार्य महाराज संस्थान या नावे द्यावा.